'चांद्रयान-3'ने कसा केला परतीचा प्रवास?

Sudesh

चांद्रयान 3

'चांद्रयान-3'चं प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात इस्रोला यश मिळालं आहे. आता यातील 'शेप' उपकरण पृथ्वीचा अभ्यास करेल.

Chandrayaan 3 Propulsion Module | eSakal

पीएम

चांद्रयानातील प्रॉपल्शन मॉड्यूल, म्हणजे पीएम हे चंद्राच्या कक्षेत फिरत होतं. 9 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रोच्या वैज्ञानिकांनी त्याला कक्षा बदलण्याची आज्ञा दिली.

Chandrayaan 3 Propulsion Module | eSakal

चंद्राभोवती भ्रमण

यानंतर चंद्राभोवती भ्रमण करत प्रॉपल्शन मॉड्यूलने चंद्राची कक्षा सोडण्याची तयारी सुरू केली.

Chandrayaan 3 Propulsion Module | eSakal

कक्षा बदल

150x112 किलोमीटर अंतरावर प्रॉपल्शन मॉड्यूलने पहिला कक्षाबदल केला. यानंतर इंधनाचा आढावा घेत 13 ऑक्टोबरला दुसरा आणि 22 नोव्हेंबरला तिसरा कक्षाबदल करण्यात आला.

Chandrayaan 3 Propulsion Module | eSakal

चंद्राला रामराम

अशा प्रकारे टप्प्या-टप्प्याने चंद्राला रामराम करून चांद्रयान-3 चं प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आलं. या कक्षेमध्ये त्याला अन्य उपग्रह, धूमकेतू किंवा उल्कापाताचा धोका नाही.

Chandrayaan 3 Propulsion Module | eSakal

चांद्रयान-3

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करुन भारताने इतिहास रचला होता.

Chandrayaan 3 Propulsion Module | eSakal

प्रज्ञान-विक्रम

चांद्रयान-3 मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे सध्या चंद्रावर चिरनिद्रा घेत आहेत. हे आता भारताचे राजदूत म्हणून कायम चंद्रावर राहणार आहेत.

Chandrayaan 3 Propulsion Module | eSakal

भारताचा विक्रम

या मोहिमेतून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला. यानंतर चांद्रयान-3 ने पुढील 14 दिवस अपेक्षित डेटा गोळा करून ही मोहीम फत्ते केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrayaan 3 Propulsion Module | eSakal