च्युइंगम खाताय? च्युइंगम खाण्याचे तोटे वाचून बसेल धक्का

साक्षी राऊत

च्युइंगमचे तोटे

बऱ्याच लोकांना च्युइंगम चघळून खाण्याची सवय असते. मात्र ते खाण्याने आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारे हानी पोहोचू शकते. चला तर जाणून घेऊया च्युइंगमचे तोटे.

chewing gum eating side effects

पोटाशी संबंधित समस्या

जास्त च्युइंगमचे सेवन पोटासाठी हानिकारक ठरू शकते. यात गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या जसे की पोटाचे दुखणे, पोटात सूज, हार्ट बर्न यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

chewing gum eating side effects

डोकेदुखी

च्युइंगम चावून खाणे मायग्रेनलाही कारणीभूत ठरू शकते. च्युइंगम जास्त चघळल्याने मांसपेशी आणि दातांवर जास्त ताण पडतो. ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरु होतो.

chewing gum eating side effects

आतड्यांचे नुकसान

च्युइंगम चघळण्याची सवय आतड्यांसाठी हानिकारक ठरू शकते. यात असणारे आर्टिफिशीयल स्वीटनर आणि शुगर आतड्यांमध्ये सूजन आणि जळजळ यांसारख्या समस्यांचे कारण ठरू शकते.

chewing gum eating side effects

दातांसाठीसुद्धा हानिकारक

च्युइंगममध्ये आर्टिफिशीयल शुगर असते. ज्यामुळे तुमच्या दातांना कीड लागणे किंवा दात सडणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

chewing gum eating side effects

जंक फूड खाण्याची क्रेविंग

तुम्हाला जास्त च्युइंगम चघळण्याची सवय असेल तर तुम्हाला जंक फूड खाण्याचीही सतत क्रेविंग होऊ शकते.

chewing gum eating side effects

वाढू शकतं ब्लड शुगर

च्युइंगमध्ये शुगरची मात्रा जास्त असते. जर तुम्ही दिवसातून बरेच वेळा च्युइंगम खात असाल तर तुमची ब्लड शुगर लेव्हलसुद्धा वाढू शकते. अशा वेळी तुम्ही शुगर फ्री च्युइंगम खाऊ शकता.

chewing gum eating side effects

तुम्हाला मधुमेह किंवा दातांशी संबंधित कुठलाही आजार असेल तर च्युइंगम खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

chewing gum eating side effects