शिवरायांची वाघनखं प्रत्यक्ष पाहायची आहेत? जाणून घ्या त्यांचा महाराष्ट्रातील प्रवास

रोहित कणसे

राज्यातल्या शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब समोर आली असून १६ नोव्हेबरला शिवरायांची वाघनखं ही मुंबईत आणली जाणार आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन वरून परत आणण्याच्या हालचालींना वेग आला असून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार उद्याच लंडनला रवाना होणार आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra

लंडन मधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत ३ ऑक्टोबरला करार करण्यात आला असून पुढील ३ वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra

त्यानुसार १६ नोव्हेंबरला शिवरायांच्या वाघनखांचे मुंबईत आगमन होणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra

१७ नोव्हेंबरला सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखांची स्थापना करण्यात येईल.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra

तर १७ नोव्हेंबर २०२३ ते २४ ऑगस्ट २०२४ दरम्यान वाघनखे सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra

एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या काळात वाघनखं कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra

नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान वाघनखे मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातील.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra

१६ नोव्हेंबर २०२६ रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तुसंग्रहालयात पाठवली जातील.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra

त्यामुळे या कालावधीत आपल्या सगळ्यांना शिवरायांच्या वाघनखांचं दर्शन घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh or Tiger Claws journey in Maharashtra