Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा अनेक प्रकारे सांगता येण्यासारखा आहे.
'छत्रपती' हा शब्दसुद्धा त्याचा एक मार्ग होऊ शकतो.
प्राचीन भारतीय परंपरेमध्ये ज्याला राज्याभिषेकपूर्वक सिंहासनावर बसवून राजा म्हणून घोषित करण्यात येते
त्याच्या डोक्यावर राजसत्तेचे प्रतीक म्हणून छत्र धरण्यात येते म्हणून तो छत्रपती.
वायव्य दिशेने भारतात प्रविष्ट झालेल्या आक्रमकांनी आपला अंमल सर्व देशभर स्थापित केल्यानंतर अशा प्रकारचा छत्रपती निर्माण होणे स्थगित झाले.
जे कोणी स्थानिक पातळीवरील सत्ताधारी असतील, ते या परकीय सत्ताधीशांच्या मेहेरबानीने त्यांचे मंडलिक म्हणून वावरायचे.
शिवरायांनी ही काही शतकांची कोंडी फोडली. इसवी सन १६७४ मध्ये त्यांनी समंत्रक राज्यारोहण केले व ते छत्रपती झाले.
ही बातमी मोगल बादशहा औरंगजेब याला समजली, तेव्हा त्याने हाय तोबा केल्याचे उल्लेख इतिहासात आहेत.
या घटनेचे गांभीर्य त्याला बरोबर कळले होते. राजकीय औपचारिकता व शिष्टाचार यांचा विचार केला
तर शिवाजी महाराज आता औरंगजेबाच्या बरोबरीने झाले होते. छत्रपती झाले होते.
योगायोग असेल किंवा नियोजनबद्ध संकल्प असेल, महाराजांची पावले या रोखाने बालपणापासूनच पडत गेली.
त्यांच्या पिताश्रींनी शहाजीराजांनी त्यांच्यासाठी काही एक सरंजाम देऊन मुद्रा किंवा शिक्काही करून दिला.
त्यात त्यांची ही मुद्रा म्हणजे सत्ता प्रजेच्या हितासाठी, कल्याणासाठी, भल्यासाठी असल्याचा उल्लेख होता.
विशेष म्हणजे समकालीन जहागीरदार, वतनदारांचे शिक्के तत्कालीन राज्यकर्त्यांच्या पर्शियन भाषेत कोरलेले असत.
महाराजांची मुद्रा मात्र संस्कृत भाषेत विलसत होती. (संदर्भ- डॉ सदानंद मोरे यांनी २०२२ मध्ये सकाळ मध्ये लिहलेला लेख)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.