मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आतून कसा दिसतो? काय आहे इतिहास?

वैष्णवी कारंजकर

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला `वर्षा` बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो.

Varsha Bungalow | Sakal

मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही वर्षा नव्हते.

Varsha Bungalow | Sakal

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 20 फेब्रुवारी 1975 रोजी मुख्यमंत्री पदावरून पायऊतार झाले आणि त्यांचा एकोणवीस वर्षांचा वर्षा बंगल्यावरील प्रदीर्घ रहिवास संपुष्टात आला.

Varsha Bungalow | Sakal

त्यांच्या हितचिंतकांपैकी कोणीतरी त्यांना सहज म्हणाले, साहेब, बंगला सोडण्याची एवढी घाई का करता? थोडे दिवस थांबा कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल. नाईक कृषिमंत्री झाले आणि त्यांच्या वाट्याला मंत्री म्हणून डग बीगन नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला आला.

Varsha Bungalow | Sakal

सरकारनं दिला तो बंगला त्यांनी स्वीकारला. ते मुळातच हौशी स्वभावाचे होते. त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनाही टापटीपीनं राहण्याची आवड होती. तसा हा बंगला अगदीच साधा होता. बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि खासगीपणा नाही.

Varsha Bungalow | Sakal

वत्सलाबाईंना क्षणभर वाटलं, सर्वांनी नाकारलेला हा बंगला आपल्या वाट्याला तर आला नाही ना? शेजारचा मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री हा बंगला केवढा भव्य! त्याच्या मागील सौधावर उभं राहिलं की मरीन लाईन्सचा नेकलेस ऑफ बाँम्बे क्वीन कसा रात्री झगमगतांना दिसतो.

Varsha Bungalow | Sakal

चौपाटीवर समुद्राच्या लाटा कशा उसळतांना दिसतात. त्याच्या विस्तीर्ण आवारात कशी सुंदर झाडं आहेत. त्याची बाग किती सुरेख आहे! त्या मानानं डग बीगन अगदीच साधा आहे.

Varsha Bungalow | Sakal

नाईक म्हणाले, छान आहे हे घर. याला एक घरंदाजपणा आहे. ते खरंच होतं. वर्षा बंगल्यामध्ये येणाऱ्या अभ्यगताला परकेपणा वाटेल, अशी औपचारिकता नव्हती.

Varsha Bungalow | Sakal

त्याला घराचा मोकळेपणा होता. मुलगा अविनाशच्या वाढदिवशी 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब डग बीगनवर राहायला आले. नाईक यांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.

Varsha Bungalow | Sakal

कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची ‘शेतकऱ्यांचे गाणे’ ही अत्यंत आवडीची कविता होती. त्यामुळे आल्या दिवशीच श्री. नाईक यांनी डग बीगनचं नामांतर वर्षा असं केलं.

Varsha Bungalow | Sakal

वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा, लिंब, सुपारी आदी विविध झाडे लावली. ते माळ्याला म्हणायचे, मी झाडं लावीन ती माझ्यासाठीच आहेत, असं समजू नकोस. पुढील काळात ती कुणालाही उपयोगी पडायला हवीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Bungalow | Sakal