'बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप

राहुल शेळके

'बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

CM Eknath Shinde Ganpati Visarjan | Sakal

पर्यावरणपूरक कृत्रिम कुंडात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

CM Eknath Shinde Ganpati Visarjan | Sakal

निवासस्थानाच्या प्रांगणात पर्यावरणपूरक पद्धतीने कृत्रिम कुंडात श्रींच्या मूर्तीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विधीवत विसर्जन करण्यात आले.

CM Eknath Shinde Ganpati Visarjan | Sakal

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती.

CM Eknath Shinde Ganpati Visarjan | Sakal

यामध्ये  शाहरुख खान, सलमान खान या दिग्गज कलाकारांसह जगातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांचे कुटुंब देखील उपस्थित होते.

CM Eknath Shinde Ganpati Visarjan | Sakal

मुख्यमंत्र्यांच्या घरी अनेक मराठी कलाकार एकत्र आले होते. यावेळी विशाखा सुभेदार, अमृता खानविलकर, स्पृहा जोशी, नम्रता संभेराव, जयवंत वाडकर, श्रृती मराठे, गौरव घाटणेकर, दीपाली सय्यद, ओंकार भोजने, सुकन्या मोने, रसिका वेंगुर्लेकर, सचिने गोस्वामी असे अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.

CM Eknath Shinde Ganpati Visarjan | Sakal

सगळ्याच कलाकारांनी ‘वर्षा’वरील बाप्पाचं दर्शन घेतलं आणि या दरम्यानचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde Ganpati Visarjan | Sakal