केसांसाठी फायदेशीर आहे नारळपाणी, 'या' पद्धतीने करा वापर

Monika Lonkar –Kumbhar

नारळपाणी

नारळपाणी हे आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

coconut water

स्किनकेअर

हिवाळ्यात आपण खास करून त्वचेची काळजी घेतो. मात्र, हिवाळ्यात केसांची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे.

coconut water

नारळपाण्याने केस धुवा

नारळपाण्याचा वापर तुम्ही केस धुण्यासाठी देखील करू शकता. नारळपाण्याने केस धुतल्याने केस हायड्रेटेड राहण्यास मदत होते. केसांच्या वाढीसाठी नारळाच्या पाण्याने केस धुणे हा अतिशय सोपा आणि फायदेशीर उपाय आहे.

coconut water

केसांना मिळते पोषण

नारळाच्या पाण्याने केस धुण्यापूर्वी सुरूवातीला केस कोणत्याही शॅंम्पूने धुवा. त्यानंतर, एका ऑरगॅनिक शॅंम्पूच्या मदतीने केस धुवा. त्यानंतर, केसांवर नारळ पाण्याचा वापर करा. नारळ पाण्याने केस धुतल्यानंतर आता केस चांगल्या प्रकारे सूकवा.

coconut water

नारळपाणी हेअर मास्क

नारळपाणी हेअर मास्क हे तुम्हाला वाचायला जरी वेगळे वाटत असले तरी सुद्धा तुम्ही हा हेअर मास्क बनवू शकता. या हेअर मास्कचा वापर केल्यावर केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल.

coconut water

चमकदार केस

हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये स्मॅश केलेली केळी घ्या. आता या केळ्यामध्ये १ चमचा दही आणि ३-४ चमचे नारळपाणी प्या. आता हा हेअर मास्क केसांवर २०-२५ मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर केस धुवून टाका. यामुळे केसांना छान चमक येते.

coconut water

केसांचे कंडिशनिंग

नारळपाण्याने केसांचे कंडिशनिंग करण्यासाठी ४ चमचे नारळ पाण्यामध्ये १ चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगार मिसळा. हे दोन्ही घटक चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर कॉटनच्या मदतीने केसांवर लावा. त्यानंतर केसांची छान मालिश करा आणि केस धुवून टाका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

coconut water