दाट केसांसाठी कोथिंबीर आहे फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

कोथिंबीर

प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये कोथिंबीरला महत्वाचे स्थान आहे. आरोग्यासोबतच कोथिंबीर केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

कोथिंबीर पेस्ट

कोथिंबीरची काही पाने घ्या आणि त्यांची बारीक पेस्ट तयार करा.

केसांसाठी लाभदायी

कोथिंबीरची बारीक केलेली पेस्ट स्काल्पवर लावा. २० मिनिटांनंतर केस धुवून टाका. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल.

कोथिंबीरचा ज्यूस

कोथिंबीरची ताजी पाने घ्या, त्यांची बारीक पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये ४-५ चमचे पाणी मिक्स करा. आता हे सर्व मिश्रण केसांना लावा.

केसांसाठी फायदेशीर

कोथिंबीरचा ज्यूस हा केसांसाठी फायदेशीर आहे. हा ज्यूस केसांना आणि स्काल्पला लावा.

माईल्ड शॅंम्पूचा वापर

कोथिंबीरचा ज्यूस केसांना लावल्यानंतर ३० मिनिटांनी माईल्ट शॅंम्पूने केस धुवून टाका. यामुळे केस चमकदार होण्यास मदत होईल.

कोथिंबीर ज्यूसचे फायदे

कोथिंबीर ज्यूस केसांना लावल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा कोथिंबीर ज्यूस केसांना लावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.