फ्रिजशिवायही कोथिंबीर अशी राहील आठवडाभर टवटवीत

अंकिता खाणे (Ankita Khane)

स्वयपाक करताना कोथिंबीर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा कोथिंबीर वापरताना सुकते आणि खराब होते.

Coriander | Esakal

फ्रिजशिवाय कोथिंबीर नक्की कशा पद्धतीने ठेवली तर चांगली टवटवीत राहील याची माहिती नसते.

Coriander | Esakal

फ्रिजमधील थंड तापमानामुळे किंवा उष्ण वातावरणामुळे कोथिंबीर खराब होत असेल तर त्यासाठी तुम्ही काय सोपे उपाय करू शकता हे जाणून घ्या.

Coriander | Esakal

कोथिंबीर किती दिवस टिकते?

कोथिंबीर ८ ते १० दिवस टिकते. त्यानंतर ती खराब होते. कोथिंबीर उष्णतेमुळे खराब होऊ शकते आणि फ्रिजमध्ये अशीच ठेवली तरीही अति थंडीमुळे खराब होऊ शकते.

Coriander | Esakal

पाण्यात देठ बुडवून ठेवा

कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या आणि खालून त्याची मुळं कापून टाका. काचेच्या जारमध्ये १ कप पाणी भरा आणि देठांसह कोथिंबीर त्यात ठेवा.

Coriander | Esakal

कोथिंबीरचा वरचा भाग पाण्याच्या बाहेर आणि देठ पाण्यात असे ठेवा. आठवड्याभरापेक्षाही अधिक काळ कोथिंबीर फ्रिजशिवाय टिकते.

Coriander | Esakal

सुती कापडाचा करा वापर

कोथिंबीर स्वच्छ करा आणि त्याचा खालचा भाग कापून सुती कापडात ठेवा. अगदी हलका पाण्याचा स्प्रे मारा.

Coriander | Esakal

ही कोथिंबीर ताजी हवा येत राहील अशाच ठिकाणी ठेवा. किमान ५ ते ७ दिवस कोथिंबीर अजिबात खराब होत नाही.

Coriander | Esakal

मलमलच्या कपड्यामध्ये कोथिंबीर

मलमलच्या कपड्यामध्येही कोथिंबीर जास्त काळ टिकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coriander | Esakal