संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी; चमचमीत, हेल्दी अन् टेस्टी कॉर्न उपमा

धनश्री भावसार-बगाडे

संध्याकाळची छोटीशी भूक

संध्याकाळी चहासोबत थोडासा काहीतरी नाश्ता असावा असं वाटतं. तेव्हाच्या या छोट्याशा भुकेसाठी पटकन काहीतरी व्हावं म्हणून हा खास पदार्थ

Corn Upma | esakal

रव्याचा उपमा

रव्याचा उपमा सर्वांनी बहुतेकदा खाल्लेला असतो. पण तुम्ही कॉर्न उपमा कधी खाल्लाय का?

Corn Upma | esakal

कॉर्न उपमा

कॉर्न उपम्यासाठी आवश्यक साहित्य अन् कृती जाणून घेऊया.

Corn Upma | esakal

साहित्य

एक वाटी स्वीट कॉर्न, दोन बारीक चिरलेले कांदे, एक चमचा तेल, जिरे, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, मोहरी, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, शेंगदाणे आवश्यक आहे, ताजी चिरलेली कोथिंबीर, किसलेले खोबरे.

Corn Upma | esakal

कृती स्टेप १

एक कप स्वीट कॉर्नमध्ये पाणी घालून ते बारीक वाटून घ्या.

Corn Upma | esakal

स्टेप २

फोडणीसाठी कढईत जीरे, मोहरी, हिंग तडतडू द्या. त्यात कढीपत्ती, किसलेले आले, हिरवी मिरची, कांदा घालून नीट परतून घ्या.

Corn Upma | esakal

स्टेप ३

कांदा नीट शिजल्यावर त्यात हळद, मीठ आणि वाटलेल्या कॉर्नची पेस्ट घालावी. ते नीट शिजू द्यावे.

Corn Upma | esakal

स्टेप ४

कॉर्न पेस्ट शिजल्यावर त्यात भाजलेल्या दाण्यांचा कूट घाला. नंतर किसलेले खोबरे आणि लिंबाचा रस घाला.

Corn Upma | esakal

स्टेप ५

सर्व पदार्थ घातल्यावर झाकण ठेवून थोड्यावेळ शिजू द्या. मग त्यावर छान कोथिंबीर घालून गार्निश करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corn Upma | esakal