देशातील पहिले पोस्ट ऑफिस माहित आहे का? युद्धकाळातही दिली सेवा

Sandip Kapde

टपाल कार्यालय

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या जवळ असणारे केरन येथील टपाल कार्यालय हे आता ‘देशातील पहिले टपाल कार्यालय’ म्हणून ओळखले जाणार आहे.

Country first post office

किशनगंगा नदी

हे कार्यालय किशनगंगा नदीच्या काठावर वसले असून, १९३२२४ असा या कार्यालयाचा पिन क्रमांक आहे.

Country first post office

केरन

केरन येथील टपाल कार्यालय आजपर्यंत देशातील शेवटचे टपाल कार्यालय म्हणून ओळखले जात होते.

Country first post office

मात्र, नियंत्रण रेषेपासूनच्या अंतराचा विचार केला असता, हे पहिले कार्यालय असल्याने, याला देशातील पहिल्या टपाल कार्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे.

Country first post office

अब्दुल हमीद कुमार

‘देशातील पहिले टपाल कार्यालय’ असा फलकही या ठिकाणी लावण्यात आला आहे. या कार्यालयाच्या पलीकडे टपालसेवा दिली जात नसल्याने आजवर हे देशातील शेवटचे कार्यालय समजले जात होते, अशी माहिती बारामुल्ला विभागाचे टपाल अधीक्षक अब्दुल हमीद कुमार यांनी दिली.

Country first post office

केरन सेक्टर

‘‘केरन सेक्टरमध्ये १९९३ मध्ये आलेल्या महापुरामध्ये हे टपाल कार्यालय वाहून गेले. तेव्हापासून ते माझ्या घरातून चालविले जात आहे,’’ असे येथील पोस्टमास्तर शाकीर भट यांनी सांगितले.

Country first post office

घरातून कार्यालय चालविण्यासाठी आपल्याला कोणतेही भाडे मिळत नाही, तसेच आपणही भाडे मागत नसल्याचे ते म्हणाले. कार्यालयात आपल्याबरोबर तीन पोस्टमन आहेत.

Country first post office

आम्ही येथील स्थानिक नागरिकांना तसेच सुरक्षा दलांना मोठ्या प्रमाणात सेवा पुरवतो, असेही ते म्हणाले.

Country first post office

इंटरनेट सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध नसल्याने, या कार्यालयातून देशातील इतर ठिकाणांप्रमाणे डिजिटल सेवा दिली जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

Country first post office

स्वातंत्र्यापूर्वीपासून अविरतपणे कार्यरत

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून तसेच पाकिस्तान वेगळा होण्याच्या आधीपासून केरन सेक्टरमध्ये टपाल कार्यालय कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

Country first post office

१९६५ आणि १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्या काळात तसेच १९९० नंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा उद्रेक झाल्यानंतरच्या काळातही या टपाल कार्यालयाने आपली सेवा थांबवली नाही.

Country first post office

भारत आणि पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २०२१ च्या करारानंतर शस्त्रसंधी होण्यापूर्वी परिसरात टपाल वितरित करायला जाणे तसेच टपाल उचलण्यासाठी जाणे अत्यंत जोखमीचे होते.

Country first post office

परंतु, आता येथे शांतता असून, दोन्ही देशांत अशाच प्रकारे शांतता नांदावी, असे येथील नागरिकांना वाटते, असे शारीर भट म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country first post office