बाळाच्या नावाचा वाद घटस्फोटापर्यंत गेला, हायकोर्टाने काढला तोडगा

सूरज यादव

मुलाच्या नावावरून वाद

एका दाम्पत्यात मुलाच्या नावावरून वाद झाला. हा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला. शेवटी प्रकरण उच्च न्यायालयात गेलं.

couple file divorce over baby name high court resolved

हायकोर्टाने काढला तोडगा

कर्नाटक उच्च न्यायालयाने या वादावर तोडगा काढत पुन्हा पती-पत्नीचं मनोमिलन घडवून आणलं.

couple file divorce over baby name high court resolved

बाळाच्या नावावरून तीन वर्षे वाद

चार न्यायाधीश, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आई-वडिलांनी सर्वानुमते बाळाचं नाव ठरवलं आणि तीन वर्षांचा वाद संपला.

couple file divorce over baby name high court resolved

पती-पत्नीचे नावाबाबत मतभेद

२०२१ मध्ये महिलेनं मुलाला जन्म दिला. पण त्याच्या नावावरून दोघांमध्ये वेगवेगळं मत होतं. पती-पत्नीमध्ये त्याच्या नावावरून वाद झाले.

couple file divorce over baby name high court resolved

पत्नी म्हणायची आदी

आई बाळाला आदी नावाने हाक मारायची. त्याचं आदी नाव कागदोपत्री कुठेही नोंद नव्हतं पण पतीला मात्र हे नाव नको होतं.

couple file divorce over baby name high court resolved

पत्नीची न्यायालयात धाव

पती-पत्नीमध्ये बाळाच्या नावावरून वाद होत होते. शेवटी महिलेनं न्यायालयात जात पतीकडून आर्थिक मदत मागितली. त्यानंतर घटस्फोटापर्यंत हे प्रकरण गेलं.

हायकोर्टाने सोडवला प्रश्न

लोक अदालतीत मध्यस्थीनंतरही प्रकरण मिटलं नाही. शेवटी उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप केला आणि यातून तोडगा काढला.

couple file divorce over baby name high court resolved

मुलाचं नाव ठेवलं आर्यवर्धन

न्यायालयाने मुलाचं नाव आर्यवर्धन असं ठेवण्याचा सल्ला दिला. या नावाला पती-पत्नीने संमती दिली.

पती-पत्नीचे मनोमिलन

मुलाचं नाव ठेवल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांमधील वाद विसरून पुन्हा एकमेकांच्या गळ्यात हार घातले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.