विराट - सूर्या नाही तर मॅथ्यू वेडच्या टॅटूला कडक सलाम | Cricketers Tattoo

अनिरुद्ध संकपाळ

विराट कोहली

स्टार क्रिकेटपटू विराट कोहली टीम इंडियातील टॅटूमॅन म्हणून ओळखला जातो. त्याच्या अंगावर विविध टॅटू आहेत.

Virat Kohli

ब्रॅडन मॅक्युलम

क्रिकेट विश्वातील अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या शरिरावर टॅटू काढले आहेत. मात्र यातील काही क्रिकेटपटूंचे टॅटू हे हटके आहेत. न्यूझीलंडचा ब्रॅडन मॅक्युलमच्या पाठीवर चार घोड्यांचा रथाचे सरथ्य करणाऱ्या योद्ध्याचा टॅटू आहे.

brandon macculam

केविन पिटरसन

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने आपल्या पाठीवर जगाच्या नकाशाच्या टॅटू काढला आहे. या जगाच्या नकाशावर केविन पिटरसनने ज्या ज्या ठिकाणी शतकी खेळी केली आहे ती ठिकाणे हायलाईट केली आहेत.

Kevin Pietersen

बेन स्टोक्स

बेन स्टोक्सने आपल्या पाठीवर सिंहाच्या कुटुंबाचा एक टॅटू काढून घेतला आहे. हा टॅटू त्याच्या कुटुंबाचे प्रतिक आहे.

Ben Stokes

सूर्याकुमार यादव

सूर्यकुमार यादवने आपल्या हातावर डोळ्याचा एक टॅटू काढला आहे.

Surya Kumar Yadav

केएल राहुल

केएल राहुलने देखील आपल्या हातावर अनेक टॅटू काढले आहेत. मात्र यात अनेक चिन्ह आणि प्रतिकांचा वापर करण्यात आला आहे.

KL Rahul

मॅथ्यू वेड

जागतिक क्रिकेटमधील सर्व टॅटूवाल्या खेळाडूंमध्ये मॅथ्यू वेडच्या हातावरील टॅटू जास्त लक्ष वेधून घेतो. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फिलिप्स ह्यूजचा टॅटू काढला आहे. ह्यूजचा ऑस्ट्रेलियातील स्थानिक सामन्यावेळी चेंडू डोक्याला लागून मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matthew Wade