रोज चपातीवर १ चमचा तूप लावून खा अन् बघा चमत्कार

साक्षी राऊत

तूपाचा वापर बऱ्याच पदार्थांत केला जातो. बरेच लोक तूप चपातीवर लावून चपाती खातात. चला तर आज आपण तूप लावून चपाती खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

Ghee On Chapati

तुपात असते गुड फॅट

तुपात गुड फॅट असते. त्यामुळे तूप चपातीला लावून खाल्ल्याने वजन कमी होते आणि फॅटसुद्धा बर्न होतात.

Ghee On Chapati

मेंदूसाठी आरोग्यदायी

तुपात पोषक तत्वे आणि सॅच्युरेटेड फॅटची मात्रा भरपूर असते. अशा वेळी मर्यादित मात्रेत तुपाचे सेवन करणे मेंदूसाठी पोषक ठरते.

Ghee On Chapati

ग्लायसेमिक लोड

तुपाची चपाती ग्लायसेमिक लोड कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्हाला सतत उर्जेचा पुरवठा सुरु असतो.

Ghee On Chapati

हार्मोनल बॅलेंस

तुपाचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी करता येऊ शकतं. सोबतच तूप हार्मोन्सला बॅलेंस करण्यासही मदत करते.

Ghee On Chapati

पोषक तत्व

चपातीला तूप लावून खाल्ल्यास शरीरात फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटामिन-ई आणि व्हिटामिन डी ची कमतरता भरून निघते.

Ghee On Chapati

हेल्दी स्किन

तुपात अँटिऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या त्वचेला मऊ आणि चमकदार बनवतात. रोज एक चमचा तूप चपातीला लावून खाल्ल्यास त्वचा कायम तरूण दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghee On Chapati