स्पोर्ट्समन असणारा CID चा 'दया' कसा झाला अभिनेता?

Vaishali Patil

टीव्हीवरील लोकप्रिय शो 'सीआयडी'मधून 'दया' ची भूमिका साकारुन घरघरात पोहचलेला अभिनेता दयानंद शेट्टी आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

Dayanand Shetty Birthday

दया ही व्यक्तिरेखा खुप प्रसिद्ध होती. तो प्रत्येक घराचा दरवाजे तोडणारा इन्स्पेक्टर म्हणून ओळखला जायचा.

Dayanand Shetty Birthday

पण दयानंद शेट्टी हा अभिनेता होण्यापूर्वी स्पोर्ट्समन होता.

Dayanand Shetty Birthday

५४ वर्षीय दयानंद यांनी आपल्या करिअरची सुरुवात खेळाडू म्हणून केली होती.

Dayanand Shetty Birthday

दयानंद हा गोलाफेक (शॉट पुट आणि डिस्कस थ्रोअर) खेळायचा. या खेळात त्याने अनेक पारितोषिकेही पटकावली.

Dayanand Shetty Birthday

तो 1994 मध्ये महाराष्ट्राकडून डिस्कस थ्रो चॅम्पियन होता. मात्र एकदा खेळताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे त्याने खेळाला राम राम ठोकला. यानंतर दयानंद यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला.

Dayanand Shetty Birthday

त्याने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.

Dayanand Shetty Birthday

1996 मध्ये आलेल्या 'दिलजले' चित्रपटात तो दिसला. त्यानंतर 1998 मध्ये टीव्ही शो सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर दयाची भूमिका त्याला ऑफर करण्यात आली.

Dayanand Shetty Birthday

दयानंदने टीव्ही शो शिवाय हिंदी, तुलू आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. तो 'जॉनी गद्दार', 'रनवे', 'सिंघम रिटर्न्स', 'गोविंदा नाम मेरा', 'यान सुपरस्टार' आणि 'द टेनंट' चित्रपटात दिसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dayanand Shetty Birthday