Anuradha Vipat
नेहा शर्मा हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. तिला न ओळखणारा क्वचितच कोणी असेल.
तिने बॉलीवूडमध्ये सीरियल किसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमरान हाश्मीसोबत क्रुक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
याआधी नेहाने तेलुगु चित्रपट ‘चिरुथा’ केला होता. पण, नंतर महेश भट्ट यांनी तिला त्यांच्या चित्रपटात संधी दिली. त्यानंतर नेहाने यशाची शिडी चढण्यास सुरुवात केली.
नेहाने यंगिस्तान, क्या कूल हैं हम, क्रूक यांसारख्या चित्रपटांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे.
नेहा शर्माला बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा होती. यासाठी नेहाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर अँड फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंग शिकले.
नेहाने काही वेळ हात आजमावला पण हळूहळू तिला अभिनय करावासा वाटू लागला. त्यानंतर तिने क्रुक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
बिहारच्या भागलपूरमधून आलेले, नेहाचे वडील राजकारणी आहेत आणि तिची बहीण आयशा शर्मा देखील एक अभिनेत्री आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.