बाबासाहेबांचे शिक्षक आंबेडकर गुरुजींचे वारसदार सध्या काय करतात?

Amit Ujagare (अमित उजागरे)

आडनाव दिलं

घटनाकार डॉ. बाबासाहेबांना शाळेतील ज्या शिक्षकांनी आपलं आडनाव दिलं, त्या कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची पिढी देखील सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. (संदर्भ - हरी नरके यांचा ब्लॉग)

Dr. Babasaheb Ambedkar

तिसरी पिढी

आंबेडकर गुरुजींची ही तिसरी पिढी आहे. आंबेडकर गुरुजी हे स्वतः सामाजिक कार्यात अग्रेसर होते. आपल्या पूर्वजांचा हाच वसा त्यांच्या आजच्या पिढीनंही पुढे चालवला आहे.

Krishnaji Ambedkar

गुरु-शिष्य

तसंच बाबासाहेब आणि आपले पणजोबा यांच्यामध्ये साताऱ्यातील शाळेतील गुरु-शिष्यांच्या ऐतिहासिक आठवणही ते कायम सांगतात.

Dr. Babasaheb Ambedkar

कुठे राहतात?

कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची आजची तिसरी पिढी ही पुणे, सातारा आणि मुंबईमध्ये राहते. यांपैकी थोरले राजीव आंबेडकर निवृत्त बँकर आहेत.

Rajiv Ambedkar, Sanjay Ambedkar, Vinayak Ambedkar

मुंबईत वकील

तर संजय आंबेडकर आणि विनायक आंबेडकर हे मुंबईत वकिलीच्या व्यवसायात असून त्यांची 'आंबेडकर असोसिएट्स' नावाची लॉ फर्म आहे.

Dr. Babasaheb Ambedkar

साताऱ्यातही मुक्काम

आंबेडकर गुरुजींची एक पिढी आजही साताऱ्यातील मंगळवार पेठेतील व्यंकटपुऱ्यात राहते, जिथं स्वतः गुरुजी राहायचे. बाबासाहेब आंबेडकर १९४८ मध्ये मजूर मंत्री असताना स्वतः या घरी आपल्या गुरुजींची भेट घ्यायला आले होते.

Dr. Babasaheb Ambedkar

शैक्षणिक, वैद्यकीय मदत

मुंबईतील आंबेडकर गुरुजींची आत्ताची पिढी आदिवासी मुलांना दरवर्षी शैक्षणिक मदत करतात. तर महालक्ष्मी ट्रस्टवर असलेले अॅड. विनायक आंबेडकर हे गरजुंना वैद्यकीय मदत करतात.

Dr. Babasaheb Ambedkar

आंबेडकरांचं तैलचित्र

तर मुंबईतील कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस इथल्या वकिलांच्या बार रुममध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं १२ फुटी तैलचित्र बसवलं आहे.

Dr. Babasaheb Ambedkar

सिम्बायोसिसच्या स्मारकाला वस्तू भेट

कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची अनेक छायाचित्रे आणि पत्रांचा ऐतिहासिक ठेवा, आंबेडकर कुटुंबांनं पुण्यातील सिम्बायोसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला दान केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Babasaheb Ambedkar