IPL 2024 मधून माघार घेतल्यानंतर CSK चा ओपनर पोहचला चेन्नईत!

Kiran Mahanavar

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आयपीएल 2024 मध्ये संघात सामील झाला आहे.

डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे या संपूर्ण मोसमात मैदानाबाहेर आहे.

तो अद्याप एकही सामना खेळलेला नाही आणि पुढेही खेळणार नाही.

पण असे असूनही तो CSK संघात सामील झाला आहे आणि त्यांच्यासोबत सराव करणार आहे.

डेव्हन कॉनवे आयपीएलपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान जखमी झाला होता आणि जेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे.

आयपीएल 2024 मध्ये तो एकही सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी रचिन रवींद्रने कर्णधार गायकवाडसह सलामीला आला आणि चांगली कामगिरी केली.

चेन्नई सुपर किंग्जने डेव्हॉन कॉनवेच्या जागी रिचर्ड ग्लीसनला संघात सामील केले आहे.

सीएसकेची फलंदाजी चांगली कामगिरी करत आहे आणि कदाचित त्यामुळेच संघाने एका वेगवान गोलंदाजाची भर घातली आहे.

MS Dhoni | CSK | IPL | X/IPL

आता फ्रँचायझीने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे की डेव्हन कॉनवे CSK संघात सामील झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.