धोम धरणाजवळील नृसिंहाचं मंदिर म्हणजे, स्थापत्यकलेचा आविष्कार; पेशवाईत मंदिराला मिळालं नवं रूप

सुनील शेडगे

Narasimha Temple Wai : वाई शहरानजीक असलेल्या धोम धरणाच्या (Dhom Dam) निसर्गरम्य परिसरात नृसिंहाचे मंदिर (Narasimha Temple) आहे. प्राचीनकाळी धौम्य ऋषींच्या वास्तव्याचा हा प्रदेश. मंदिर परिसरातील कमळाकृती पुष्करणीची म्हणजे इथले आगळे, अनोखे वैशिष्ट्य.

Narasimha Temple Wai Taluka

धोम हे कृष्णा नदीवरचे धरण. कृष्णा अन् वाळकी नदीच्या संगमावर असलेल्या धोम गावानजीक हे धरण बांधण्यात आले. धरणाकडेला असलेले नृसिंहाचे मंदिर म्हणजे अप्रतिम स्थापत्यकलेचा आविष्कार.

Narasimha Temple Wai Taluka

या परिसरात धौम्य ऋषींचे वास्तव्य होते. त्यावरून धोम हे नाव पडले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. वाईहून पश्चिमेस जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला मंदिर परिसर आहे. तो दगडी तटबंटीने बंदिस्त आहे. प्रांगणात शिवमंदिर आहे. ते पूर्णतः घडीव पाषाणात बांधण्यात आले आहे.

Narasimha Temple Wai Taluka

मंदिरासमोर असणारी कमळाकृती पुष्करिणी पाहाणाऱ्यास थक्क करून सोडते. त्याच्या मधोमध कोरलेल्या कासवाच्या पाठीवर मेघडंबरीप्रमाणे शिखरासह नंदी आहे. मंदिराच्या दक्षिण- पूर्व कोपऱ्यात एक भुयारी विहीर आहे. परिसरात पाषाणात कोरलेला सुबक, रेखीव नंदी आहे.

Narasimha Temple Wai Taluka

पुढे उंच अष्टकोनी जोत्यावर नृसिंह मंदिर उभारलेले आहे. वर जाण्यास पायऱ्या आहेत. मंदिराच्या आत गेल्यावर पूर्व- पश्चिम अशा विरुद्ध दिशांना नरसिंहाच्या दोन रेखीव मूर्ती आहेत. पूर्वेकडेची मूर्ती हिरण्यकश्यपूचा वध करणारी, तर पश्चिमेकडेची नरसिंह मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. नृसिंह जयंतीचा उत्सव वैशाख शुद्ध दशमीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Narasimha Temple Wai Taluka

पेशवाईत या मंदिराला नवे रूप मिळाले. राज्यासह कर्नाटकातूनही भाविक इथे दर्शनासाठी येतात. इथल्या परिसरातील पांडेवाडी, भोगाव, कोंढवली, मेणवली आदी गावांनाही विविध संदर्भ आहेत. कमळगड, पांडवगड, केंजळगड हे किल्लेही नजीक आहेत.

Narasimha Temple Wai Taluka

इतिहासप्रेमींच्या अगत्याचा विषय असलेल्या रायरेश्वरालाही इथून पुढे जाता येते. साताऱ्यातून सुमारे दीड तासांत मंदिरस्थळी पोचता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narasimha Temple Wai Taluka