IPL 2024 : धोनी की कार्तिक... स्लॉग ओव्हरमध्ये कुणाचं स्ट्राईक रेट आहे जबरदस्त?

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल 2024 मध्ये 16 ते 20 षटकात सर्वात जास्त स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर रियान पराग आहे. त्याने 39 चेंडूत 233 च्या स्ट्राईक रेटने 91 धावा केल्या आहेत.

या यादीत चेन्नईचा थला महेंद्रसिंह धोनी हा चौथ्या स्थानावर आहे. त्याने 25 चेंडूत 236 च्या स्ट्राईक रेटने 59 धावा केल्या आहेत.

सनराईजर्स हैदराबादचा अब्दुल समाद या यादीत तिसऱ्या स्थानवर असून त्याने 36 चेंडूत 242 च्या स्ट्राईक रेटने 87 धावा केल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज फलंदाज ट्रिस्टन स्टब्स दुसऱ्या स्थानावर असून त्याने 39 चेंडूत 246 च्या स्ट्राईक रेटने 98 धावा केल्या आहेत.

25 पेक्षा जास्त बॉल खेळलेल्या फलंदाजांमध्ये 16 ते 20 षटकात सर्वात जास्त स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्यांमध्ये दिनेश कार्तिक अव्वल आहे. त्याने 70 चेंडूत 253 च्या स्ट्राईक रेटने 177 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.