Corona Virus पेक्षाही भयंकर आहे डिसीज X? इथे वाचा

साक्षी राऊत

कोरोना व्हायरसने एके काळी सगळ्यांना हादरवून टाकले होते. मात्र या महामारीपासून बचावासाठी आता व्हॅक्सिन आलेली आहे. कोरोना व्हायरसचा धोका कमी होत नाही ते आणखी एका मोठ्या महामारीची चर्चा सुरु आहे.

Disease X

काय आहे डिसीज X?

डिसीज X हे कुठल्याही आजाराचे नाव नसून ही एक टर्म आहे ज्याचा वापर अशा आजारांसाठी केला जातो जे इन्फेक्शनमुळे पसरतात. आणि ज्याबाबत तुम्हाला पुरेशी माहिती नसते.

Disease X

WHO ची चेतावणी

डिसीज X महामारी संदर्भात WHO ने चेतावणी जारी केली आहे. WHO च्या मते, ही महामारी आल्यास कोरोना व्हायरसपेक्षा जास्त बळी जाण्याची शक्यता दर्शवली आहे.

Disease X

यूकेच्या शास्त्रज्ञांचा सल्ला

यूकेच्या शास्त्रज्ञांच्या असे म्हणणे आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये डिसीज X महामारी पसरू शकते. ही महामारी कोरोनाप्रमाणेच व्हायरस आणि कुठल्यातरी प्राण्यापासून सुरु होईल आणि माणसांमध्येही पसरू लागेल.

Disease X

कमकुवत इम्युनिटी

असे म्हटले जाते की कमकुवत इम्युनिटी असणाऱ्यांसाठी डिसीज X जीवघेणा ठरू शकतो. यात ४-५ कोटी लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, प्रदूषण, जगभरातील वाढती लोकसंख्या आणि क्लायमेट चेंजमुळे या महामारीचा धोका वाढलाय.

Disease X

इबोलापेक्षा जास्त भयंकर

यूके शास्त्रज्ञांची एक टीम जवळपास २५ व्हायरसचे निरीक्षण करत आहे. हे सगळे व्हायरस माणसांमध्ये पसरू शकतात आणि ते इबोलापेक्षा भयंकर असल्याचा दावा केला जातोय.

Disease X

व्हॅक्सिन बनवण्यास सुरुवात

ब्रिटनचे शास्त्रज्ञ डिसीज X वर व्हॅक्सिन बनवण्याच्या तयारीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disease X