घरीच तयार करा अशा हटके डिझाइनर पणत्या

Aishwarya Musale

आता सर्वच घरांमध्ये दिवाळीची तयारी सुरु झाली. दिवाळीची साफसफाई, फराळाच्या पदार्थांची यादी, कपडे दागिन्यांची खरेदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवाळीत घरच्या सजावटीची तयारी.

दिवाळीला आणखी एक गोष्ट खूप महत्वाची असते. ती म्हणजे पणत्या. दिवाळी हा दिव्यांचा असतो. अमावास्येच्या रात्री दिव्यांनी अंधकार दूर करावा अशी मान्यता आहे.

या दिवसात दिवे सहज बाजारात उपलब्ध असतात. सर्वांना सुंदर डेकोरेट केलेले दिवे आवडतात. पण ते महाग देखील असतात. अशावेळी आपण हे मातीचे दिवे घेऊन ते घरच्याघरी काही सोप्या वस्तूंच्या मदतीने डेकोरेट करू शकतो.

तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या आणि डिझाईनच्या पणत्या घेऊन त्याला वेगवेगळ्या रंगानी सजवू शकता. डिझाइननुसार तुम्ही दिव्यांचा रंग निवडा आणि त्यावर नक्षीकाम काम करा.

तुम्ही तांदळाच्या मदतीने देखील पणती सजवू शकता. यासाठी दोन अगदी सध्या पणत्या घ्या. त्यांना आपल्याला हवा तो रंग द्या.

नंतर त्याच्या बाहेरील बाजूने तांदूळ चिकटवा. एका कार्डबोरचे छोटे गोलाकार स्टॅन्ड बनवून त्या पणत्या विरुद्ध पद्धतीने एकवार एक लावा. आणि पुन्हा त्या पणत्यांना हव्या रंगांनी आणि मोती किंवा स्टोनने सजवा.

तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सुंदर पणती सजवू शकता. पानातील आधी एक रंग देऊन घ्या. त्यानंतर रंगांचे ठिपके देऊन पणतीवर डिझाईन तयार करा.

पणतीला पांढरा रंग देऊन त्यावर रंगीबेरंगी टिकल्या लावा. आणि इतर रंगांच्या मदतीने त्यावर छोटे छोटे ठिपके द्या. या पणत्या सध्या तरीही खूप सुंदर दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.