Diwali Recipe: कुरकुरीत शंकरपाळी रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रीयन कुटुंबात दिवाळीच्या सणाला फराळ म्हणून शंकरपाळी हमखास बनवली जाते.

साहित्य: ग्रॅम मैदा, 3 चमचे तूप, 1.2 कप साखर, 1.3 कप पाणी

एका बाऊलमध्ये अर्धा कप गरम पाणी घेऊन त्यात अर्धा कप साखर मिक्स करा. 

साखर चांगली विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहा.

साखर विरघळल्यानंतर त्या पाण्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून 3 ते 4 मिनिटे मिश्रण चांगले ढवळत राहा.

मैद्यामध्ये हे पाणी घालून त्याचा चांगला मऊशार गोळा बनवून घ्या. 

पिठाचा गोळा चांगला घुसमलून व मळून 1 ते दीड तासांसाठी बाजूला ठेऊन द्या.

मळलेलं पीठ घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.

लाटण्याला थोडं तेल लावून जाडसर पोळी लाटून घ्या.

आता ती पोळी तुम्हाला हव्या त्या आकारात किंवा शंकरपाळ्यांच्या आकारात कट करा.

शंकरपाळ्या गोल्डन-ब्राऊन रंग येईपर्यंत तेलात चांगल्या तळून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.