केळी खाल्ल्यानंतर या गोष्टी खाऊ नका, कारण...

Aishwarya Musale

आपल्या आहार शास्त्रात काही गोष्टी कटाक्षाने पाळण्याचा सल्ला दिला जातो. आपलं आरोग्य सुदृढ रहावं यासाठीच काही नियम बनवले गेले आहेत.

Sliced Banana | Sakal

आता हेच बघा ना, केळी खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाऊ नयेत असं सांगितलं जातं. कारण केळी आणि काही गोष्टी एकत्र खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Banana | Sakal

दही खाऊ नये

दही हा आंबट आणि थंड पदार्थ आहे. उन्हाळ्यात दही ताक खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, तुम्हाला माहिती आहे का, केळी खाल्ल्यानंतर दही खाऊ नये, त्यामुळे अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. 

Don't eat curd after eating banana | Sakal

डाळ

केळी खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारची डाळ खाऊ नये. मसूर, तूर अशा डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात. पण केळी खाऊन यांचे सेवन करणे हानिकारक असते. 

don't eat dal after eating banana | sakal

चहा

चहा आणि केळी हे दोन्ही वाईट अन्न संयोजन आहेत आणि ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात. म्हणूनच केळी खाल्ल्यानंतर कधीही चहा पिऊ नका. किंवा चहा प्यायल्यानंतर केळी खाऊ नका. यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा समस्या होऊ शकतात.

Do not drink tea after eating banana | Sakal

एका दिवसात एक किंवा दोनच केळी खावीत. केळी हे एकदम सकाळी उपाशीपोटी किंवा रात्रीच्या वेळी खाऊ नये, कारण यामुळे कफाचा त्रास होण्याची शक्यता असते.

Banana | Sakal

सकाळी उपाशीपोटी केळी खाल्यामुळे पोटात गॅस होणे, पोटदुखी, उलटी, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात.

Banana | Sakal

केळी खाल्याने मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ नये यासाठी मुलांना केळी हे दुपारच्या वेळेसच खाण्यास द्यावे.

Banana | Sakal

त्वचा आणि केसांसाठी ॲव्होकॅडो अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.