संधिवाताच्या सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको; वेळीच घ्या काळजी

Aishwarya Musale

सांधेदुखी

सोप्या किंवा सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, 'आर्थरायटीस' म्हणजे संधिवात.

आर्थरायटीस

तज्ज्ञांच्या मते, भारतात 15 टक्के म्हणजे जवळपास 180 दशलक्ष लोकं 'आर्थरायटीस'च्या समस्येने ग्रस्त आहेत. 

आजाराची लक्षणे

पण या आजाराची वेळीच ओळख करून घेतल्यास तो गंभीर होण्यापासून रोखता येईल, असेही आरोग्य तज्ज्ञ सांगतात. या आजाराची लक्षणे जाणून घेऊयात.

थकलेले असणे

काम केल्यानंतर थकवा जाणवणे हे सामान्य आहे. पण दिवसभर छोटी कामे केल्यानंतर थकवा जाणवणे हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. संधिवातामध्येही अशीच लक्षणे असतात.

सुजलेले सांधे

सांध्यांना सूज आणि लालसरपणा जाणवणे हे सांधेदुखीचे प्रमुख लक्षण असू शकते.

सांध्यांचा आकार बदलणे

शरीराच्या कोणत्याही सांध्याचा आकार बदलणे हे देखील या गंभीर आजाराचे कारण आहे. हाडांमध्ये गाठ तयार होणे हे देखील संधिवाताचे लक्षण असू शकते.

भूक न लागणे

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण जर तुम्हाला भूक लागत नसेल तर हे देखील संधिवाताचे कारण असू शकते.

आरोग्य

हे लक्षण सहसा इतर काही आरोग्य समस्यांशी देखील संबंधित असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.