रोहित कणसे
पोह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर, आयरन आणि विटॅमिन्स देखील आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पण दररोज पोहे खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
आरोग्य तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पोह्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.
तज्ज्ञांच्या मते पोहे खाल्ल्याने पोट खूप जास्त वेळेपर्यंत भरलेलं राहतं, ज्यामुळे ओव्हरइटिंग होत नाही.
त्यामुळे पचन व्यवस्थीत राहणे आणि ओव्हरइटिंग टाळल्याने शरीरात चरबी जमा होत नाही.
मात्र पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स देखील आढळतात, ज्यामुळे वजन आणि ब्लड शुगर लेव्हल वाढते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर पोहे कमी प्रमाणात रोज सकाळी खाल्ले तर वजन कमी होण्यात मदत होऊ शकतो, मात्र याचे अतिसेवन नुकसानकारक आहे.
दररोज पोहे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढत नाही आणि ब्लड व्हेसल्स हेल्दी राहतात, त्यामुळे हाय बीपीचा त्रास होत नाही.
दररोज पोहे खाल्ल्याने शरीर एनर्जेटिक राहते आणि शरीरात रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून विशेष माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.