सकाळी रिकाम्या पोटी केळी खाण्याचे तोटे वाचून व्हाल थक्क

साक्षी राऊत

केळीमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. मात्र रिकाम्या पोटी या फळाचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. रिकाम्या पोटी केळीचे सेवन केल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

Banana Eating Side Effects

अॅसिडीटीची समस्या

केळीमध्ये असा कंपाउंड असतो ज्यामुळे रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने अॅसिडिटीचा त्रास वाढतो.

Banana Eating Side Effects

मधुमेहाची समस्या

केळीमध्ये शुगर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे ब्लड शुगर प्रभावित होऊ शकते. तेव्हा रिकाम्या पोटी केळी खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Banana Eating Side Effects

पोटाशी संबंधित समस्या

काही लोकांना केळी पचवताना समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पोटात गॅस, ब्लोटिंग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Banana Eating Side Effects

लठ्ठपणाची समस्या

केळीमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते. तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर रिकाम्या पोटी केळी खाणे टाळा.

Banana Eating Side Effects

सर्दी खोकल्याची समस्या

सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास सर्दी खोकल्याची समस्या उद्भवू शकते.

Banana Eating Side Effects

तेव्हा तुम्हीसुद्धा रिकाम्या पोटी केळी खाण्याची चूक करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banana Eating Side Effects