व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक?

Aishwarya Musale

पाण्याची कमतरता

आपल्या शरीराचा बराचसा भाग पाण्याने व्यापलेला असतो, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा आणि चिडचिड अशा समस्या निर्माण होऊ लागतात.

व्यायाम

बहुतेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की निरोगी व्यक्तीने दिवसभरात फक्त 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. आता जिममध्ये व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी प्यायचे की नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.

जेव्हा आपण जिममध्ये घाम गाळतो तेव्हा आपल्याला पाणी पिण्याची आवश्यकता वाटते. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

जिम केल्यानंतर तुमचे शरीर गरम असते, त्यावर लगेच पाणी प्यायले तर नुकसान होणारच. व्यायामानंतर लगेच पाणी पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

वर्कआऊट नंतर शरीराला थोडी विश्रांती द्या, घाम निघून गेल्यावरच पाणी प्या.

घाईगडबडीत पाणी पिऊ नका, आरामात पाणी प्यायल्याने शरीराचे नुकसान होत नाही.

बसून आरामात पाणी प्या, असं केल्यास पाणी शरीराच्या बहुतांश भागांपर्यंत पोहोचते.

जिम केल्यानंतर नॉर्मल पाणी प्या, फ्रिजचे थंड पाणी हे कधीच चांगले नसते.

अचानक बीपी कमी झाला तर करा हे 3 घरगुती उपाय, जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.