दुर्वांचे 8 उपयोग, सौंदर्यापासून ते मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी

सकाळ डिजिटल टीम

गणपतीला दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपतीची पूजा पुर्ण होतच नाही. दुर्वांचे अनेक औषधी उपयोगांमुळेच बाप्पाला दुर्वा प्रिय असाव्यात.

दुर्वांमध्ये असणारे 'फ्लॅवोनाईड्स' शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यासाठी, दुर्वांचा रस अतिजेवण झाल्यावर अपचनावर, बद्धकोष्ठतेच्या त्रासावर उपयुक्त ठरते.

युरिन इन्फेक्शन झाल्यास दिवसातून दोन वेळेस दुर्वांचा रस लिंबू पिळून घ्यावा, असे सांगितले जाते.

मासिक पाळीत खूप पोट दुखत असल्यास किंवा ब्लिडिंग खूप जास्त होत असल्यास दुर्वांचा रस घ्यावा.

अंगावरून पांढरे पाणी जाण्याचा त्रास होत असल्यास म्हणजेच महिलांना व्हाईट डिस्जार्च जास्त होत असल्यास दुर्वांचा रस आणि दही एकत्र घेणे फायद्याचे ठरते.

दुर्वांचा रस घेतल्याने शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. यामुळे मधुमेहींसाठी दुर्वांचा रस अतिशय गुणकारी आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दुर्वा उपयुक्त ठरतात. दररोज सकाळी दोन टेबलस्पून एवढा जरी दुर्वांचा रस घेतला तरी आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते.

मुळव्याधचा त्रास होत असल्यास दुर्वांचा रस आणि दही घ्यावे.

पिंपल्स किंवा अंगावर आलेले पुरळ कमी करण्यासाठी दुर्वांचा रस उपयोगी ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.