Health : मसालेदार पदार्थ खाल्ल्याने कोणते तोटे होतात? पहा...

सकाळ डिजिटल टीम

मसालेदार पदार्थ खाणे सगळेजण पसंत करतात मात्र तुम्हाला माहिती आहे का की, हे आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते.

जास्तीचे तेल आणि मसालेदार पदार्थ हे जड असतात त्यामुळे ते सहज पचत नाहीत. परिणामी भूक कमी होते.

मसालेदार अन्न खाल्ल्याने तुम्हाला लठ्ठपणा येऊ शकतो. यात कॅलरीज जास्त असतात त्यामुळे चरबी वाढते.

यामुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते. पचन बिघडते आणि याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होते.

यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. पोटातील उष्णता वाढते आणि पिंपल्सची समस्या होऊ शकते.

रात्री मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्स होऊ शकतो. यामुळे तुम्हाला गॅस, अपचनच्या समस्या उद्भवू शकतात.

जास्त तेलकट मसाला खाल्ल्याने शरीरातील यकृताच्या समस्या वाढू लागतात.

तेलकट मसालेदार अन्नामध्ये ट्रान्स फॅट्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.