Hasan Mushrif : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या घरावर ED नं का टाकली धाड? मुश्रीफ अडचणीत!

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज (बुधवार) सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीनं छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल (Kagal) येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचं समजतं. ईडीचे जवळपास 20 अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले.

सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याचप्रकरणात ही कारवाई झाल्याचं समजतं.

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे नाव आहे. याशिवाय, ते शरद पवार यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळं आजच्या धाडसत्रानंतर ईडीनं मुश्रीफांवर अटकेची कारवाई केल्यास तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धक्का ठरणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून 158 कोटी रुपयांचा घोटाळा केला.

यामध्ये हसन मुश्रीफ यांचा जावई आणि मुलगा सहभागी असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं.

मुश्रीफांनी ग्रामविकास मंत्री असताना १५०० कोटींचं कंत्राट त्यांच्या जावयाच्या बनावट कंपनीला दिलं. मी याचे पुरावे दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितलं, असं सोमय्या म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif