Emraan Hashmi : बॉलिवूडचा किसर बॉय इमरान हाश्मी ठरला 'सिक्वेल HERO'

सकाळ डिजिटल टीम

आकर्षक अभिनय

बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी हा त्याच्या आकर्षक अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनयाची चुणूक आणि उत्तम कामगिरीसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता सध्या सिक्वेल हिरो ठरतो आहे.

Emraan Hashmi

टायगर-3 मध्ये चालली इमरानची जादू

एका यशस्वी सिक्वेलमधून दुसऱ्या भागाकडे जाताना त्याचा अभिनय भाव खाऊन जातो. मर्डर 2, जन्नत 2, राझ 2 आणि राज 3 च्या सिनेमॅटिक अनुभवांनंतर इमरानने आता अलीकडे रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर टायगर 3 मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली.

Emraan Hashmi

इमरान बनला सिक्वेलचा 'सुपरहिरो'

टायगर 3 च्या दमदार यशाने इमरान सिक्वेलचा सुपरहिरो बनला आहे. त्याने आजवर अनेक हिट फ्रँचायझी केल्या आणि तो एक उत्तम अभिनेता आहे हे दाखवून दिलं.

Emraan Hashmi

टायगर 3 ची इंडस्ट्रीत चर्चा

टायगर 3 ची क्रेझ असताना इमरान बद्दलच्या अनेक चर्चा इंडस्ट्रीत होत आहेत. जन्नत 3 आणि आवारापन 2 आता येणार का ? आणि यात इमरान भूमिका साकारणार का? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. प्रेक्षक या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Emraan Hashmi

यशस्वी सिनेमॅटिक अनुभव देणारा अभिनेता

टायगर 3 च्या यशाचा आनंद लुटत असताना आणि जन्नत 3 आणि आवारापन 2 च्या चर्चांना उधाण आलं आहे. इमरानने हे सिद्ध केले की, तो केवळ एक बॉलीवूड स्टार नाही तर यशस्वी सिनेमॅटिक अनुभव देणारा अभिनेता देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emraan Hashmi