Europe Tour : युरोपची सहल करा स्वस्तात मस्त!, पाहा सोप्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

युरोप टूरसाठी तात्काळ ऐवजी तुम्ही अॅडव्हांसमध्ये फ्लाईट बुकिंग करुन ठेवू शकता. त्यामुळे जेव्हा ट्रीप फायनल कराल तेव्हा तिकट आधीच बुक करुन ठेवलेले सोयिस्कर आणि स्वस्त असण्याची शक्यता असते.

ऑफ सिझनमध्ये ट्रीप अरेंज करणार असाल तर केवळ रहाणे आणि खाणे पिणे याच गोष्टी तुलनात्मक स्वस्त पडू शकतात. येथील पर्यटन स्थळी गर्दी कमी असल्याने अधिक मजा घेऊ शकता.

राहण्यासाठी तुम्ही हॉटेल्स ऐवजी हॉस्टेलचा पर्याय निवडू शकता. हे तुम्हालाही स्वस्त पडेलच शिवाय इतर प्रवाशांना भेटण्याची संधीही मिळू शकते.

तुम्हाला जर हॉस्टेलमध्ये रहाणे पंसत नसेल आणि हॉटेलमध्ये राहणे परवडणारे नसेल तर तुम्ही एयरबीएनबीची पर्याय निवडू शकता.

युरोपमध्ये टॅक्सीतून फिरणे महागडे पडू शकते यासाठी म्हणून तुम्ही टॅक्सी शेअरिंग हा पर्याय निवडू शकता. ज्यामुळे तुम्हाला कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी मदत होईल.

प्रवास करत असताना सोबत ड्राईफ्रुट्स, बिस्कीटे असे काही खाद्यपदार्थ जवळ ठेवा. भूक लागल्यानंतर हे तुमच्या कामी येईल शिवाय वारंवार हॉटेलमध्ये जाण्याची गरजही लागणार नाही.

युरोपातील प्रत्येक ठिकाणी फिरण्यासाठी चांगली वाहतूक सुविधा आहे. त्यामुळे ट्रीपवेळी याचा वापर करु शकता. फिरण्यासाठी या रस्त्यांची मदत होईल.

जर युरोपमध्ये तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना अधिक प्रवास असेल तर असा प्रवास शक्यतो रात्रीच्यावेळी करा म्हणजे अशावेळी तुमचा रात्रीचा स्टे करण्याचा खर्च वाचवू शकता.

महागड्या हॉस्टेल्स ऐवजी तुम्ही बाहेरील खाण्याचा आनंद घेऊ शकता. यातील काही क्षण तुमच्या नेहमी स्मरणात राहतील शिवाय यातून पैसेही वाचतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.