Women Rights: प्रत्येक विवाहित महिलेला माहित असावेत कायद्याने दिलेले हे अधिकार

साक्षी राऊत

सगळ्यांसाठी लग्न हे आनंदी नसतं

लग्नानंतर प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. लग्नानंतर काहीचं आयुष्य हे आनंददायी होतं तर काहींच्या आयुष्याचं वाटोळं होतं.

Women Rights

महिलांची संख्या जास्त

आतापर्यंतच्या आकड्यानुसार घटस्फोटाचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून येते. नात्यात सर्वाधिक अत्याचार या बायका सहन करत असतात. कारण त्यांना त्यांच्या अधिकारांबाबत योग्य माहिती नसते.

Women Rights

महिलांनी शासनाने दिलेत हे अधिकार

हिंदू मॅरेज अॅक्ट सेक्शन १३ अंतर्गत कुठलीही महिलाच्या तिच्या पतीच्या सहमतीशिवाय घटस्फोट घेऊ शकते. जर तिच्या नवऱ्याने तिचा मानसिक किंवा शारीरिक छळ केला असेल तर तिला हा अधिका शासनानेच दिलाय.

Women Rights

स्त्रीधन अधिकार

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ आणि हिंदू मॅरेज अॅक्ट १९५५ मध्ये सेक्शन २७ अंतर्गत महिला त्यांचा मालकी हक्क मागू शकतात. तिच्या या हक्कांचं हनन होत असेल तर ती तक्रार करू शकते.

Women Rights

सासरी राहण्याचा हक्क

महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असेल किंवा तिच्या घरचे तिला बळजबरीने माहेरी पाठवत असेल तर तिला हक्काने सासरी राहण्याचा अधिकार आहे.

Women Rights

मुलांची कस्टडी

घटस्फोटानंतरसुद्धा महिलेला तिच्या मुलांची कस्टडी मागण्याचा अधिकार आहे. ती सासर सोडून जातानासुद्धा तिच्या मुलांना नेण्याचा तिला पूर्ण अधिकार असतो.

Women Rights

अबॉर्शनचा अधिकार

द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी अॅक्ट १९७१ अंतर्गत महिला तिला हंव तेव्हा अबॉर्शन करू शकते. त्यासाठी तिला तिच्या सासरच्यांची परमिशन घेण्याची गरज नसते.

Women Rights

संपत्तीचा अधिकार

The Hindu Succession Act 1956 नुसार 2005 मध्ये झालेल्या संशोधनानुसार मुलगी लग्न झालेली असो किंवा नसो तिला तिच्या पित्याच्या संपत्तीत बरोबरीचा हक्क आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Rights