आल्याचा अतिवापर ठरू शकतो हानिकारक...

Aishwarya Musale

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आल्याचा वापर केला जातो. वेगवेगळ्या अन्नपदार्थांपासून ते चहामध्ये देखील आले घातले जाते. चहामध्ये आले घातल्याने त्याची चव वाढते आणि आरोग्याला देखील फायदा होतो.

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आल्याचा वापर अनेक औषधी बनवण्यासाठी केला जातो. परंतु त्याचा अतिवापर आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. 

गर्भधारणा

जर तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भधारणेची योजना आखत असाल तर जास्त आले खाणे टाळा. आलं उष्ण असते गरोदरपणात आले जास्त खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.

मधुमेह

आल्याचे अतिसेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हानिकारक ठरू शकते. विशेषत: जेव्हा तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल तेव्हा आले जास्त प्रमाणात खाणे धोकादायक ठरू शकते.

त्वचा

जर तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल किंवा तुमची त्वचा संवेदनशील असेल तर अद्रक मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीर ठरू शकते. 

पोटासाठी हानिकारक

आल्याचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. खरं तर, यामुळे पोटात जळजळ आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हृदयाशी संबंधित समस्या

जास्त प्रमाणात आले खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कारण आल्याचा परिणाम थेट हृदयाच्या ठोक्यावर होतो.

आल्याचे जास्त सेवन केल्याने डोळे लाल होणे, खाज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाला सूज येणे, डोळ्यांना खाज येणे आणि घशाचा त्रास होऊ शकतो. 

रेड वाईनमुळे खरंच उजळतो चेहरा? जाणून घ्या सत्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.