या पदार्थांच्या सेवनाने सुधारेल तुमची दृष्टी Food For Eyesight

Aishwarya Musale

जीवनशैली

आपली झपाट्याने बदलणारी जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर सतत परिणाम होत असतो.

Eyesight | sakal

लॅपटॉप

आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही बराच वेळ मोबाईल-लॅपटॉपवर घालवत असते.

Eyesight | sakal

आहार

स्क्रीनच्या अतिवापरामुळे तुमचे डोळेही कमकुवत झाले असतील तर काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. त्यांचे सेवन दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Eyesight | sakal

गाजर

गाजर हे बीटा-कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. चांगल्या दृष्टीसाठी, विशेषतः रात्री नीट दिसावे यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक असते.

Eyesight | sakal

रताळं

रताळं हे देखील बीटा-कॅरोटीनचा आणखी एक उत्तम स्रोत आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक देखील असते. त्यातील अनेक गुणधर्मांमुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.

Eyesight | sakal

पालक

पालक हे अँटिऑक्सिडंट्स मॅक्युलाचे संरक्षण करण्यास मदत करतात. मॅक्युला हा डोळ्याचा एक असा भाग आहे जो सेंट्रल व्हिजनसाठी किंवा दृष्टीसाठी जबाबदार असतो.

Eyesight | sakal

केळी

केळीमध्येही ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन सी व के मुबलक प्रमाणात असते. हे दोन्ही घटक डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते.

Eyesight | sakal

अंडी

अंडी हे ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन तसेच व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहेत. त्यात बरीच प्रथिनेही असतात. त्यांच्या सेवनाने डोळ्यांना फायदा होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eyesight | sakal