Fashion : अस्सल मराठमोळी दागिने; तुमच्याकडे यापैकी किती दागिने आहेत?

सकाळ डिजिटल टीम

मराठमोळे दागिनयांचे खूप प्रकार पाहायला मिळतात यापैकी सर्व नाही पण काही पारंपरिक दागिन्यांचे प्रकार आपल्या ठेवणीच्या दागिन्यांमध्ये हवेत.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal

तन्मणी

तन्मणी हा दागिना पेशव्यांचा दागिना मानला जातो. पारंपारिक दागिन्यापैकी हा एक भारदस्त असा दागिना आहे.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal

मोहनमाळ

महालक्ष्मीच्या दागिन्यातील हा एक महत्त्वाचा दागिना मानला जातो. हा दागिना कमी वजनाचा असला तरी दिसायला मात्र भारदस्त दिसतो. हा दागिना घातल्या वर एक राजेशाही लूक येतो.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal

कोल्हापूरी साज

कोल्हापूरकडच्या लोकांनी हा साज मोठया प्रमाणात वापरून त्याचे नामकरण ‘कोल्हापुरी साज’ असे केले. मध्यभागी लोलक असते त्यास 'पानडी' असेही म्हणतात.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal

कुडी

सोन्याचे किंवा मोत्याचे ६ ते ७मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना ‘कुडी’ म्हणतात. कुडय़ा या विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal

नथ

नथीचे मुख्य दोन प्रकार असतात एक संपूर्ण गोल असते आणि दुसरी लंबवर्तुळाकृती असून नाकाच्या एका बाजूस असते.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal

वज्रटीक

हा पारंपरिक दागिना स्त्रिया पूर्वी जास्त प्रमाणात घालत असे. पण आजही अनेक स्त्रिया हा दागिना आवडीने घालताना दिसतात.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal

तोडे

हा दागिना बांगडयांपेक्षा ही दिसायला जाड असतो. हिरव्या बांगड्यांसोबत हा दागिना घातल्यावर त्या स्त्रीचे रूप अधिक खुलून दिसते.

ठूशी

ठुशी या प्रकारांत बारीक मणी एकमेकांमध्ये एकदम जवळजवळ गुंफलेले असतात. याशिवाय मोरणी ठुशी, मोहनमाळ ठुशी असे ठुशीचे अनेक प्रकार पहायला मिळतात.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal

बुगडी

कानाच्या पाळीच्या वरच्या भागांवर घातली जाणारी बुगडी अजूनही स्त्रीवर्गात खूपच प्रिय आहे.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal

चिंचपेटी

चिंचपेटी ही प्रामुख्याने मोत्याची असते. मोत्यांच्या दोन-तीन माळांमध्ये गुंफलेल्या उभ्या पेट्या हेच चिंचपेटीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtrian Traditional Jewellery | esakal