विराट की बाबर... टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 10 हजार धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर?

अनिरुद्ध संकपाळ

जोस बटलर

इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने 372 सामने आणि 350 डावात टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजारापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो सध्या टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 10 हजार धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

अॅरोन फिंच

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार फिंच या यादीत पाचव्या स्थानावर असून त्याने 327 डावात 10 धावा पूर्ण केल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 10 हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नर चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 304 सामन्यात 303 डावांमध्ये ही कामगिरी केली.

विराट कोहली

भारताच्या विराट कोहलीने 314 सामन्यात 299 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ख्रिस गेल

ख्रिस गेलने 290 सामन्यात 285 डावात टी 20 मध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या. यापूर्वी सर्वात वेगाने 10 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला होता.

बाबर आझम

मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने 281 सामने अन् 271 डावात 10 हजार धावा पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले.

'इंग्लंडचे खेळाडू आताच विमान पकडतील अन् मायदेश गाठतील.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.