FIFA World Cup 2022 : चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळालेले 'हे' आहेत 5 सामने

अनिरुद्ध संकपाळ

कतारमधील अटी शर्ती पाहून जगभरातील फुटबॉल चाहते यंदाच्या फिफा वर्ल्डकपकडे पाठ फिरवतील असे वाटले होते. मात्र साखळी फेरीतच चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहेत. जवळपास 5 सामन्यांमध्ये 60 हजरापेक्षा जास्त लोकांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.

यात पहिला क्रमांक लागतो तो अर्जेंटिना विरूद्ध मॅक्सिको सामन्याचा! या सामन्यावेळी 88 हजार 996 लोक लुसैल स्टेडियममध्ये उपस्थित होते.

त्यानंतर लुसैल स्टेडियमवर झालेल्या ब्राझील - सर्बिया यांच्या सामन्यात देखील 88 हजार 103 लोकांनी उपस्थिती लावली. त्यांच्याच साक्षीने पाचवेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ब्राझीलने बाद फेरी गाठली.

सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला पराभवचा धक्का देत सर्वांनाच अवाक केलं होतं. लुसैसच्या स्टेडियमवर रंगलेल्या या ऐतिहासिक सामन्याचे 88 हजार 12 प्रेक्षक प्रत्यक्ष साक्षीदार ठरले.

अल बयत स्टेडियमवर अमेरिकेने धडाक्यात सुरूवात करणाऱ्या इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. हा सामना पाहण्यासाठी 64 हजार 463 लोकांनी स्टेडियममध्ये उपस्थिती लावली होती.

यजमान कतार आणि इक्वाडोर यांच्या अल बयत स्टेडियमवर झालेल्या सामन्यात देखील प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. यजमान कतारचा वर्ल्डकप इतिहासातील पहिला सामना पाहण्यासाठी 67 हजार 372 लोक स्टेडियममध्ये आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.