अभिनेत्री नयनताराविरुद्ध जबलपूरमध्ये एफआयआर दाखल

Anuradha Vipat

हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप

OTT प्लॅटफॉर्म Netflix वर दाखवल्या जाणाऱ्या 'अन्नपूराणी' या चित्रपटावर भगवान श्रीरामाचा अपमान आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

FIR filed against actress Nayantara

स्टारकास्टविरोधात एफआयआर दाखल

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये धार्मिक भावना भडकावल्याबद्दल एका हिंदू संघटनेने चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्री नयनतारा यांच्यासह संपूर्ण स्टारकास्टविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

FIR filed against actress Nayantara

भगवान श्री राम यांचा अपमान

हिंदू सेवा परिषदेचे अतुल जेसवानी म्हणाले की, अन्नपूर्णी चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, जी हिंदू धर्मातील पूजनीय मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा अपमान करतात.

FIR filed against actress Nayantara

यांच्या मते चित्रपटात...

चित्रपटात भगवान श्रीराम यांच्या विरोधात अयोग्य कमेंट करून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जेसवानी यांच्या मते, चित्रपटात लव्ह जिहाद दाखवण्यात आला आहे.

FIR filed against actress Nayantara

हेही चित्रपटाच्या कलाकाराने...

प्रभू श्री राम वनवासात प्राण्यांना मारायचे आणि मांस भक्षण करायचे हेही चित्रपटाच्या कलाकाराने दाखवले आहे.

FIR filed against actress Nayantara

गुन्हा दाखल

पोलिसांनी नीलेश कृष्णा (दिग्दर्शक), नयनतारा (कलाकार), जतिन सेठी (निर्माता), आर रवींद्रन (निर्माता), पुनित गोयका (निर्माता), सारिक पटेल आणि मोनिका शेरगिल यांच्याविरुद्ध कलम १५३ आणि ३४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

FIR filed against actress Nayantara

या कारणामुळे फ्लॉप झाला अक्षयचा 'सम्राट पृथ्वीराज', आदित्य चोप्रावर दिग्दर्शकाचे अनेक आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay's 'Samrat Prithviraj' flopped