सूरज यादव
टीव्हीएस कंपनी पहिली सीएनजी स्कुटी बाजारात आणणार आहे. या गाडीचा फर्स्ट लूकही समोर आलाय.
टीव्हीएसने या स्कुटीमध्ये १२४.८ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिलंय. स्कुटीला ५.३ किलोवॅट पॉवर आणि ९.४ एनएम टॉर्क मिळतो.
स्कुटर पेट्रोल आणि सीएनजी असे मिळून एकत्रित २२६ किलोमीटरपर्यंत धावू शकते. याचे टॉप स्पीड ८०.६ किमी प्रतितास इतकं आहे.
टीव्हीएसने सीएनजी स्कुटीमध्ये २ लीटर पेट्रोल टँक आणि १.४ किलो ग्रॅम सीएनजी टँक दिलाय.
एक किलो सीएनजी भरल्यास टीव्हीएसची ही स्कुटी ८४ किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. कंपनीने त्यांच्या या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी सीट या गाडीला दिलीय.
टीव्हीएसच्या सीएनजी स्कुटीमध्य मॅक्स मेटल बॉडी, एक्स्टर्नल फ्यूएल लीड, फ्रंट मोबाईल चार्जर, सेमी डिजिटल स्पीडॅमीटर, बॉडी बॅलन्स टेक्नॉलॉजी आणि लेग स्पेसही जास्त दिलीय.
पेट्रोलवरून सीएनजीवर शिफ्ट करण्यासाठी वेगळं बटन देण्यात आलंय. याशिवाय ऑल इन वन लॉक, साइड स्टँड इंडिकेटरही देण्यात आलाय.
टीव्हीएसच्या या बाईकची एक्स शोरूम किंमत १ लाख रुपयांपर्यंत आहे. बाजारात येणारी ही पहिली सीएनजी स्कुटी असेल.
टीव्हीएस मोटरने भारतात मोबिलिट ग्लोबल एक्सपो २०२५ मध्ये ज्युपीटर सीएनजी स्कुटी सादर केलीय. अद्याप याची लाँचिंग तारीख कंपनीने सांगितलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.