कोणत्या संघाकडून कोणी सर्वात आधी 100 IPL सामने खेळले? PBKS आहे अपवाद

अनिरुद्ध संकपाळ

चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वात पहिल्यांदा सुरेश रैनाने आयपीएलमधील 100 सामने खेळले.

मुंबई इंडियन्सकडून हरभजन सिंगने 100 आयपीएल सामने खेळले.

आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वात आधी 100 आयपीएल सामने खेळले.

केकेआरकडून गौतम गंभीरने सर्वात आधी 100 आयपीएल सामने खेळण्याचा मान पटकावला.

राजस्थान रॉयल्सकडून अजिंक्य रहाणेने सर्वात आधी 100 आयपीएल सामने खेळले.

सनराईजर्स हैदराबादकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सर्वात आधी 100 आयपीएल सामने खेळले.

यानंतर आता ऋषभ पंतने देखील दिल्लीकडून 100 आयपीएल सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.

विशेष म्हणजे पंजाब किंग्जकडून अजून कोणत्याही खेळाडूने 100 आयपीएल सामने खेळलेले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.