कोकणात खुलला फुलोत्सव; कातळावर पसरलाय रंगीबेरंगी फुलांचा सडा

राजेंद्र बाईत

श्रावणातील आल्हाददायक वातावरणामध्ये सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्र किनारपट्टीच्या विविध भागांमध्ये विविधांगी आकर्षक रंगीबेरंगी फुलांचा फुलोत्सव खुलला आहे.

वार्‍याच्या झुळकीसोबत हिरव्यागार डोंगर परिसरात डोलणारी विविधांगी आकर्षक आणि मनमोहक फुले मन उल्हासित करतात.

हिरव्यागार माळरानावर निसर्गाने पांघरलेल्या रंगीबेरंगी फुलोत्सवाच्या चादरीचे सौंदर्य लुटण्याची पर्यटकांनी संधी उपलब्ध झाल्याने अनेकांची पावले कातळ परिसराकडे वळू लागलेत.

ऊन-पावसाच्या खेळासोबत श्रावण महिन्यामध्ये कोकणचे निसर्गसौंदर्य चांगलेच नटले आहे.

ठिकठिकाणी उंचावून कोसळणारे धबधबे आणि त्याच्या जोडीने निसर्गाने पांघलेली हिरवी शाल सार्‍यांचीच मने चांगलीच रिजवितात.

डोंगर परिसरासह माळरानावरील रंगबेरंगी फुलांचा खुललेला फुलोत्सव चांगलीच भर टाकत आहे.

जैतापूरमार्गे गेलेल्या सागरी महामार्गावर रस्त्यानजीकचे कातळ, साखर परिसर, सोल्ये येथे कोकण रेल्वे थांबा परिसरामध्ये या विविधांगी फुलांना बहर आला आहे.

निळ्या-जांभळ्या-पांढर्‍या रंगाच्या या फुलांचे मनमोहक सौदर्यही चांगले खुलले आहे.

साखर परिसरातील जांभ्या कातळावरही नाविण्यपूर्ण फुलवनस्पती फुलल्या आहेत.

जांभ्या कातळावर निसर्गाने पांघरलेल्या रंगीबेरंगी, निळाशार चादरीचे सौंदर्य लुटण्याची अनोखी संधी पर्यटकांना मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.