टायफॉईडमधून बरे झाल्यानंतर अशक्तपणा जाणवतोय? मग, अशा प्रकारे घ्या काळजी

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळा

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जण आजारी पडतात. वातावरणातील थंडाव्यामुळे सर्दी-ताप, खोकल्यासोबत इतर अनेक आजार जडतात. 

Health Care

या आजारांमध्ये टायफॉईडचा ही समावेश आहे. टायफॉईड हा खूप धोकादायक आजार आहे.

Health Care

टायफॉईड

हा एक प्रकारचा जिवाणू संसर्ग आहे, जो दूषित पाणी आणि अन्नामुळे होतो.

Health Care

अशक्तपणा

या आजारामध्ये व्यक्तीच्या आतड्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे, या आजारातून बाहेर पडल्यानंतर ही व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे, आरोग्याची खास काळजी घेणे, महत्वाचे असते. 

Health Care

पौष्टिक आहार घ्या

टायफॉईडमधून बाहेर पडल्यानंतर, शरीरात प्रचंड अशक्तपणा जाणवतो. यातून बरे होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करा. या पदार्थांमुळे तुमच्या शरीरात ऊर्जा वाढण्यास मदत होईल. 

Health Care

या पदार्थांमध्ये प्रथिनांनीयुक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि धान्य इत्यादी घटकांचा समावेश करायला विसरू नका. यामुळे, तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल.

Health Care

शरीर हायड्रेटेड ठेवा

टायफॉईडमध्ये आपल्या शरीरातील आतड्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. यासोबतच, ताप, उलट्या आणि जुलाबामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. ज्यामुळे, शरीराला अशक्तपणा येतो. त्यामुळे, या अशक्तपणाला दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.

Health Care

हिवाळ्यातील सुपरफूड आहे बाजरी, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of bajra