सणासुदीच्या दिवसांमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताय? ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ डिजिटल टीम

सणासुदीच्या हंगामाला ऑगस्टपासूनच सुरुवात झाली. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगची मागणी वाढली आहे.

ऑनलाइन शॉपिंग करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकता.

तुम्ही पण ऑनलाईन शॉपिंगचा विचार करत असाल तर खालील महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करताना लक्षात घ्या.

खरेदीदरम्यान, कोणत्याही उत्पादनावरील ऑफर समजून घ्या.

मोठ्या सवलती पाहून लोक खरेदी सुरू करतात पण त्यासाठी आवश्यक असलेल्या ‘टर्म्स आणि कंडिशन’ तपासा.

कोणत्या सवलतीचा फायदा घेण्यापुर्वी इतर वेबसाइट्स आणि मार्केट प्लॅटफॉर्मवरही त्या उत्पादनाची खरी किंमत तपासा.

कंपनी आपला माल थेट Amazon आणि Flipkart सारख्या शॉपिंग साइट्सवर विकत नाही, तर उत्पादन विकणारे ‘सेलर्स’ वेगळे आहेत. त्यामुळे हे सेलर्स कोण हे तपासा.

याशिवाय खरेदी केल्यानंतर पेमेंट करताना विशेष काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.