'शिवकालीन राजमार्ग पुन्हा एकदा खुला होणार'; संभाजीराजेंनी दिली दुर्गराज रायगडाला भेट

सकाळ डिजिटल टीम

रायगड विकास प्राधिकरण मार्फत दुर्गराज रायगडवर (Durgaraj Raigad) सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार संभाजीराजेंनी (Sambhajiraje) रायगडास भेट दिली.

SambhajiRaje visit Durgaraj Raigad

गडाचे प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक नाना दरवाजाच्या पुनर्बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यात प्रामुख्याने दरवाजाच्या मूळ बांधकामातील काळानुरूप निखळून पडलेले 300 हून अधिक दगड सापडलेत.

SambhajiRaje visit Durgaraj Raigad

याच मूळ दगडांचा वापर करून दरवाजाच्या बुरुजाचे, तटबंदीचे, तसेच मोडकळीस आलेल्या दोन कमानी, छताचे संवर्धन व पुनर्बांधणी होत आहे.

SambhajiRaje visit Durgaraj Raigad

हा शिवकालीन राजमार्ग असल्याने व त्याचे संवर्धन अतिशय चांगल्याप्रकारे होत असल्यामुळे मला आनंद होत असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

SambhajiRaje visit Durgaraj Raigad

पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी नाणे दरवाजावर शिवकालीन व्यवस्था होती. त्याचा शोध घेऊन त्याचं संवर्धन व पुनर्बांधणीचे काम सुरू आहे.

SambhajiRaje visit Durgaraj Raigad

येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होऊन शिवकालीन राजमार्ग पुन्हा एकदा शिवभक्तांना खुला होणार आहे.

SambhajiRaje visit Durgaraj Raigad

Pearl Farming : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात पिकणार खरेखुरे 'मोती'; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.