Aishwarya Musale
गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांत गणपती बाप्पा विराजमान होतात आणि त्यांची पूजा करण्यात येते.
दहा दिवस चालणारा हा गणेशोत्सव मोठ्या धूम-धडाक्यात आणि उत्साहात साजरा होतो.
महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, मात्र देशाच्या इतर राज्यांमध्येही पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा केली जाते.
यंदा 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून यावेळी तुम्हाला पूजेसाठी काही वेगळा ड्रेस ट्राय करून स्पेशल दिसायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्रीयन लूक ट्राय करू शकता
जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लूक हवा असेल तुम्ही नऊवारी साडीव ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल.
महाराष्ट्रीयन लूक हवा असेल तर साडीसोबतच अन्य दागिने घालताना नथही नक्की वापरा. नाकात तुम्ही प्रेसची नथही वापरू शकता. त्यामुळे तुमचा ट्रॅडिशनल लूक पूर्ण होईल.
पारंपारिक महाराष्ट्रीयन लूक हवा असेल तर तो गजऱ्याविना अपूर्ण राहतो. त्यामुळे तुम्ही केसांचा अंबाडा घालून, मोगऱ्याचा किंवा इतर फुलांचा गजरा , अथवा वेणी केसांमध्ये माळू शकता.
प्रथम चेहऱ्यावर थोडे फाऊंडेशन लावावे. डोळ्यांत छान काजळ घालावे, तसेच आयलायनरचाही वापर तुम्ही करू शकता. तुमच्या साडीच्या रंगाशी मॅचिंग अशी आयशॅडोही तुम्ही लावू शकतात. कपाळावर छान चंद्राकोर लावा.तुमचा मस्त महाराष्ट्रीयन लूक तयार होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.