पुणेकरांचे मोदक प्रेम! उकडीच्या सव्वादोन लाख मोदकांची विक्री

Sandip Kapde

गणेश चतुर्थीनिमित्त शहरात उकडीच्या मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी होती.

ukadiche modak pune

सायंकाळपर्यंत सुमारे सव्वादोन लाख मोदकांची विक्री झाली असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

ukadiche modak pune

गतवर्षी हीच संख्या दीड लाख इतकी होती.

ukadiche modak pune

गणरायाला प्रतिष्ठापनेवेळी नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीच्या मोदकांना विशेष महत्त्व असते.

ukadiche modak pune

त्यामुळे सर्वच व्यावसायिकांकडे ग्राहकांनी मोदकांची आगाऊ मागणी नोंदवली होती.

ukadiche modak pune

त्यातही या मोदकांमध्ये पारंपरिक हातवळणीच्या मोदकांना अधिक पसंती असते. मात्र त्यासाठी विशेष कौशल्य लागते.

ukadiche modak pune

त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच तयारीला सुरुवात झाली होती.

ukadiche modak pune

मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोदकांची विक्री सुरु होती.

ukadiche modak pune

एक मोदक सुमारे ३० ते ३५ रुपये किमतीस उपलब्ध होता.

ukadiche modak pune

उकडी पाठोपाठ तळणीच्या मोदकांना सर्वाधिक मागणी होती.

ukadiche modak pune

विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांनी तळणीचे मोदक खरेदी केले.

ukadiche modak pune

दिवसभरात तळणीच्या सुमारे आठ हजार किलो मोदकांची विक्री झाली.

ukadiche modak pune

४०० रुपये किलोप्रमाणे हे मोदक उपलब्ध होते.

ukadiche modak pune

मोदकांच्या अन्य प्रकारांमध्ये चॉकलेट, आंबा, मावा, काजू व मलई मोदकांना भाविकांना पसंती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ukadiche modak pune