Ganpati Visarjan Kolhapur : पारंपरिक वाद्यांचा थाट अन् DJ च्या दणदणाटात बाप्पांना निरोप

सकाळ डिजिटल टीम

दिवसभर पारंपरिक वाद्यांचा थाट

कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांच्या गजराबरोबरच विविधरंगी प्रकाशझोतांमध्ये सळसळत्या उत्साहात न्हाऊन निघालेल्या भव्य मिरवणुकांनी गुरुवारी कोल्हापूरकरांनी बाप्पांना निरोप दिला. दिवसभर पारंपरिक वाद्यांचा थाट तर सायंकाळनंतर साऊंड सिस्टीम आणि लेझर शो, मल्टीकलर शार्पींनी मिरवणूक रंगतदार केली.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur

मिरवणुकीत पावसाचे आगमन

मिरवणुकीत पावसाचे आगमन झाले आणि काही काळ कार्यकर्त्यांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागली.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur

आकर्षक विद्युतरोषणाई

महाद्वार रोडवर आकर्षक विद्युतरोषणाई आणि संगीताच्या ठेक्यावर तरुणाईने जल्लोषी नृत्य केले.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur

मर्दांच्या खेळाची प्रात्यक्षिके

भर पावसात मर्दांच्या खेळाची प्रात्यक्षिके करणाऱ्या महिला.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur

मिरवणुकीत महिला व मुलींचा मोठा सहभाग

यंदाच्या मिरवणुकीत महिला व मुलींचा सहभाग मोठा राहिला. पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर सम्राट तरुण मंडळाच्या महिलांनी धरलेला लेझीमचा ठेका.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur

विविध विषयांवर भाष्य करणारा चित्ररथ

तुकाराम माळी तालीम मंडळाने वर्तमानातील विविध विषयांवर भाष्य करणारा चित्ररथ आणला. राजर्षी शाहूंची दूरदृष्टी कुठे आणि सद्य:स्थिती काय, असा सवाल त्यातून उपस्थित केला.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur

लेझर शो आणि मल्टीकलर शार्पी

लेझर शो आणि मल्टीकलर शार्पीमुळे महाद्वार रोड रात्री अशा रंगांत न्हाऊन निघाला.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur

आजीबाईंना लेझीम खेळण्याचा मोह

पारंपरिक वाद्यांच्या गजरात आजीबाईंनाही लेझीम खेळण्याचा मोह आवरता आला नाही. (फोटो : बी. डी. चेचर, मोहन मेस्त्री, नितीन जाधव, प्रकाश पाटील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur