सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली होSSS...

साक्षी राऊत

गौराई

पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने विविध भागात गौराईंचे आगमन झाले आहे.

Gauri Festival

गौराईचे माहेरी आगमन

दोन दिवसांपूर्वी बाप्पांचे घरोघरी आगमन झाले आणि गेली महिनाभर 'भादल्याच्या सणाला मी येईल असा माहेराला निरोप पाठवणारी गौराई माहेरी आली आहे.

Gauri Festival

काल सकाळपासूनच घरोघरी गौराई आगमनाची लगबग सुरु होती. फुले, आघाडा, दुर्वांनी, कण्हेरीच्या फुलांच्या माळांनी, सजविलेले न्हावण घेऊन महिलांचे जथ्थे येऊ लागले.

Gauri Festival

गौराईचा साज

जरीच्या साड्या, अंगभर दागिने, हातभर बांगड्या अशा पारंपारिक थाटात गौराई गीते गात सर्वत्र हा सोहळा झाला.

Gauri Festival

गौराईची विलक्षण सुंदर प्रतिमा बघून साक्षात गौराई माहेराला आल्याचा भास होतो.

Gauri Festival

गौराईच्या आगमनाने यावेळी घरोघरी आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण दिसून येते.

Gauri Festival

गौराईला सजवून तिचे सुंदर फोटो अनेकांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Festival